New
You are here: Home / भगवान बुद्ध / भगवान बुद्धाचे अपमान करणारी ‘बुद्धा’ सीरिअल बंद झालीच पाहिजे
भगवान बुद्धाचे अपमान करणारी ‘बुद्धा’ सीरिअल बंद झालीच पाहिजे

भगवान बुद्धाचे अपमान करणारी ‘बुद्धा’ सीरिअल बंद झालीच पाहिजे

‘बुद्धा’ सीरिअल चा निर्माता, बी के मोदी हा एक इंडस्ट्रीयालिस्ट आहे आणि स्पाइस ग्रुप चा मालिक आहे. स्पाइस ग्रुप ही कंपनी ‘स्पाइस’ नावाचे मोबाइल बनवित असते. बी के मोदी याने कुठून तरी डॉक्टरेट ची पदवी मिळवून नावा पुढे डॉ लावून घेतले. मोदी हा विश्व हिंदू परिषद चा प्रमुख नेता आहे तसेच महाबोधी सोसायटी चा अध्यक्ष सुद्धा होता. हा महाबोधी सोसायटी चा माजी अध्यक्ष भारतातील आंबेडकरवादी बौद्धांना व नाव-बौद्धांना ‘बौद्ध’ मानीत नाही. (संदर्भ: ‘ए मेटर ऑफ इक़्विटी’, लेखक- जॉन दयाल). इंटरनेट वर बरीच माहिती उपलब्ध आहे. या वरून लक्षात येते की १८९५ साली महान बौद्ध धम्म प्रचारक ‘अनागरिक धम्मपाल’ यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटी वर आज आरआरएस चा पूर्ण कब्जा आहे. त्यामुळे आज पुष्कळ ठिकाणी महाबोधी सोसायटी ला पूर्ण बंदी घालण्याचे सुद्धा बौद्ध लोक मागणी करीत आहेत.

भगवान बुद्धाचे इतिहास खराब करण्याचे काम ब्राह्मनांनी थेट बुद्धाच्या काळा पासूनच सुरु केले होते, ते आजतागायत सुरु आहे. हा क्रांती प्रतिक्रांती चा भाग आहे. ब्राह्मण कधीच पुढे नसतो. बुद्धाला बदनाम करण्यासाठी ब्राह्मणांनी त्याच्या काळातच विविध युक्त्या करून विविध लोक पुढे केले होते. प्राचीन काळातील प्रचारमाध्यम शिल्प होते. ब्राह्मणांनी बुद्धाच्या शिल्पाला तोडले किंवा विद्रूप करून देवी देवता मध्ये रुपांतर केले. बुद्धाचे साहित्य भेसळ करून विकृत केले. त्यात विविध चमत्कारिक गोष्टी घुसळून बुद्धाच्या मूळ वैज्ञानिक सिद्धांताला टाळे फासले. चौथ्या पाचव्या शतकात जातक कथा लिहून पुनर्जन्माचा थोतांड मांडला. या जातक कथांवर आधारित रामायण लिहिण्यात आले. नवव्या दहाव्या शतकामध्ये विष्णू पुराण इत्यादीच्या माध्यमातून बुद्ध थेट विष्णूचा नववा अवतार करून टाकला. महाभारत तर त्याच्याही नंतर लिहिण्यात आले. ब्राह्मणांनी त्यात्या काळातील प्रचार तंत्राचा वापर करून बुद्ध इतिहासाला ब्राह्मणी वर्चस्वाखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या काळातील बौद्धांनी कदाचित या बदमाशी कळे दुर्लक्ष केले असावे. आजचे प्रचार तंत्र द्रुकमाध्यम (visual Media) टीवी आणि सिनेमा आहेत. या माध्यमा मध्ये सुद्धा आज ब्राह्मण पाठी मागे राहून बुद्ध धम्म संपविण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आज या लोकांनी ‘बुद्धा’ नावाची सिरीयल बनविली आहे, ती दर रविवारी ‘झी टीवी’ वर ११ वाजता दाखविली जाते.

२००३-४ साल च्या दरम्यान शेखर कपूर ने सुद्धा ‘महाबोधी सोसायटी’ चे ब्राह्मण वर्चस्व अधीन असलेले ‘बी के मोदी’ चा वापर करून बुद्धा वर सीरिअल बनविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळेस ते पूर्णत्वास नेता आले नाही. सध्याच्या ०८-०९-२०१३ ला झी टीवी वरून सुरु करण्यात आलेल्या ‘बुद्धा’  या सिरीयल चा डायरेक्टर ‘आशुतोष गोवारीकर’ नावाचा ब्राह्मण आहे. आधी गोवारीकर ने बुद्धा वर सिनेमा बनविण्याचे ठरविले होते, मात्र ब्लिस संस्थेने त्याला जेव्हा त्याची ब्राह्मणी ओळख देवून त्यांच्या बदमाशी चे उतारे देवून पत्र लिहिले तेव्हा त्याने सिनेमा बनविण्याचे बाद केले. सिरीयल ला यश मिळविण्यासाठी वैश्विक स्तरांवरील मोठ्या मोठ्या लोकांना निर्माण कार्या मध्ये शामिल करून घेतले आहे. वैश्विक स्तरा वर नामांकित महाबोधी सोसायटीच्या माजी अध्यक्ष बी के मोदी ला शामिल केले. बी के मोदी विश्व हिंदू परिषदेचा नेता असल्याचे आधीच सांगितले आहे. सिरीयल च्या चित्रिकरणा साठी ‘इंदिपेन्डेंस डे’, ‘दी जाकेल’, ‘स्टारगेट’ सारख्या हॉलीवूड च्या सिनेमांचे चित्रीकरण करणाऱ्या सिनेमातोग्राफेर ‘कार्ल वाल्तर लेदेन्लाब’ ला पाचारण केले. सिनेमाचे चे कथानक ऑस्कर विजेता ‘डेविड वार्ड’ ने लिहिले आहे, वेशभूषा- एप्रिल फेरी (युएसए), डेविड रुसेल (ऑस्ट्रेलिया)- कथा कलाकार, आणि असे अनेक विश्व स्तरावरील मंडळी ची रेलचेल बुद्धाला ब्राह्मण वर्चास्वाखाली आणण्यासाठी वापरण्यात आली आहे. एकूण ६०० कोटींचा बजेट ठेवून बुद्धाला संपविण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे.

या सीरिअल मध्ये पहिल्या दिवशीच बुद्धाचे जन्म होणार असल्याचे एक ब्राह्मण भाकीत करतो, आणि बुद्धाचा जन्म त्याच नक्षत्रात होणार ज्या नक्षत्रमध्ये रामचा जन्म झाला असे तो सांगतो. इतर सर्व ब्राह्मणी गोष्टी तर आहेतच पण सर्वात महत्वाची आणि आज पर्यंतच्या इतिहासातील बुद्धाचा सर्वात मोठा अपमान या सीरिअल मध्ये करण्यात आला आहे. तो म्हणजे बुद्धाचा जन्म ‘पुत्र कामेष्टी यज्ञातून’ झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ‘पुत्र कामेष्टी यज्ञ’ तो प्रकार आहे ज्यानुसार रामाचा जन्म झालेला आहे असे रामायणा मध्ये लिहिले आहे. बाबासाहेबांनी ‘रिडल्स ऑफ हिंदुस्म’ मध्ये लिहिले आहे की दशरथ नपुसंक असल्यामुळे ब्राह्मणांसोबत समागमातून राम, लक्ष्मण वगैरे चा जन्म झालेला आहे. ‘पुत्र कामेष्टी यज्ञ’ चा खरा प्रकार अमिताभ बच्चन च्या ‘एकलव्य’ या सिनेमा मध्ये दाखविण्यात आला आहे. अश्या गलीच्छ प्रकारातून बुद्धाचा सुद्धा जन्म दाखविणे हा बुद्धाचा सर्वात मोठा अपमान आहे. शेवटी ब्राहमन हा बुद्धाचा बाप असल्यामुळे बुद्ध ज्ञानी आहे असा इतिहास ब्राह्मणांना भविष्यासाठी रचायचा आहे. ज्याप्रकारे आज लोक कुठलाही संदर्भ शोधण्यासाठी शिलालेख जाऊन वाचत नाही तर पुस्तकामध्ये शोधतात, आणि मागील १० वर्षात तर इंटरनेट वरच सर्व संदर्भ शोधले जातात. तसेच भविष्यात कोणी पुस्तक वाचणार नाही तर थेट इंटरनेट वरच सर्व संदर्भ शोधले जातील. आणि मग त्या मध्ये बुद्ध या सिरीयल मधील संदर्भ प्रभावी मानले जातील. त्यामुळे दृकमाध्यम कळे दुर्लक्ष करणे सर्वात मूर्खपणाचे आहे. हे आम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे.

या बाबी लक्षात आणून देवून सुद्धा बौद्ध लोक, नेते, संघटना, संस्था, पक्ष शांत का बसलेले आहेत, हेच समजत नाही. या सीरिअल च्या पुढील एपिसोड मध्ये सुधारणा करून ही सीरिअल तशीच चालू ठेवणे तेवढेच घातक आहे. ही सीरिअल पूर्ण बंद करणे हाच मार्ग आहे. आणि जर मोदीला बुद्धा ची सिरीयल दाखवायचीच असेल तर सुरुवाती पासून बाबासाहेबांच्या ‘बुद्ध आणि धम्म’ या पुस्तका वर आधारित कथानक पुन्हा नव्याने रेकॉर्डिंग/शूटिंग करून दाखविले पाहिजे. भारतातील बौद्धानी विदेशातील बौद्ध भिक्कू आणि राष्ट्रांकडून बौद्ध धर्म शिकण्याची गरज नाही. कारण बौद्ध धर्म भारतात निर्माण झालेला आहे, त्याला जगात नेण्याचे काम अशोकाने केले आहे आणि त्याचे सत्य वैज्ञानिक स्वरूप बाबासाहेबांनी सांगितले आहे. तसेच सीरिअल व सिनेमा मध्ये बुद्धाचा चेहरा दाखवू नये असे सुद्धा बौद्ध विद्वानांचे म्हणने आहे, कारण बुद्धाच्या चेहऱ्यावरील महाकारुनिकता, सम्यक सम्बुद्धता साकारणे कोणाला ही शक्य नाही. म्हणून ही सीरिअल बंद पाडण्यासाठी बौद्धांनी सर्वकस प्रयत्न करावेत. ‘पुत्र कामेष्टी यज्ञ’ च्या कारणावरून मोदी, झी टीवी आणि या सिरीयल वर पोलीस गुन्हे सुद्धा दाखल करावेत.

डॉ परम आनंद (८८०५४६०९९९)

विहार सेवक, भारत लेणी संवर्धन समिती (ब्लिस)

About admin

Follow Us on

Leave a Reply

Scroll To Top